आर.टी.ई.- 25 टक्के ऑनलाईन प्रवेश 2 मार्चपर्यंत

kids photo

नवी मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

आरटीईअंतर्गत 25 टक्के ऑनलाइन प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला 2 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 (RTE ACT 2009) अन्वये दु्र्बल, वंचित व विशेष गरजाधिष्ठित बालकांसाठी आरक्षित 25 टक्के प्रवेशाची सन 2017-18 ची प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात  ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

यामध्ये पालकांच्या व पालक संघटनांच्या मागणीचा विचार करून शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांचेकडील 24 फेब्रुवारी 2017 रोजीच्या पत्रानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 2 मार्च 2017 रोजी संध्याकाळपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

सदर वाढीव मुदतीची नोंद घेऊन इच्छुक पालकांनी याचा लाभ घ्यावा असे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.