हार्बर रेल्वे सेवा हळूहळू रुळावर

मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

हार्बर मार्गावरील जीटीबी नगर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत आज पहाटे मालगाडीचे डबे घसरल्यामुळे ठप्प पडलेली रेल्वे सेवा पुन्हा हळूहळू रुळावर येत आहे. 

मालगाडी घसरल्यामुळे हार्बरमार्गावर सीएसटी ते कुर्ला दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मेन लाईनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली होती. तसेच बेस्ट बसचीही मदत घेण्यात आली होती.

 रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घसरलेल्या मालगाडीचे डबे बाजूला करून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.