राज्यात भाजपच सरस

 मुंबई, ठाण्यात शिवसेना वरचढ

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला मतदारांचा हिसका

मुंबई, 23 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या गेलेल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह 283 पंचायत समित्यांचा निकाल आज लागला. शिवसेना- भाजपने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या या निवडणुकीत मुंबई, ठाणे महापालिका स्वतःकडेच ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे. तर उर्वरित 8 महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत साऱ्यांना मागे फेकले आहे. या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला नाकारले आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे या निकालाने प्रत्येकाला आपली ताकद दिसून आली आहे.

  • शिवसेनेचे वर्चस्व – मुंबई महापालिका, ठाणे महापालिका
  • भाजपचे वर्चस्व – उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला, नागपूर  
  • 10 महानगरपालिकांमधील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहेत.
  1. मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 84
2 भाजप 82
3 काँग्रेस 31
4 राष्ट्रवादी काँग्रेस 9
5 मनसे 7
6 इतर 14
एकूण 227

 

  1. ठाणे महापालिका

ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 805 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 67
2 भाजप 23
3 काँग्रेस 3
4 राष्ट्रवादी काँग्रेस 34
5 मनसे 0
6 इतर 4
एकूण 131

 

  1. उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महापालिकेच्या 78 जागांसाठी 821 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 25
2 भाजप 33
3 काँग्रेस 1
4 राष्ट्रवादी काँग्रेस 4
5 मनसे 0
6 इतर 15
एकूण 78

 

  1. नाशिक महापालिका

नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी 1089 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 34
2 भाजप 67
3 काँग्रेस 6
4 राष्ट्रवादी काँग्रेस 5
5 मनसे 5
6 इतर 5
एकूण 122

 

  1. पुणे महापालिका

पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी 626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 10
2 भाजप 98
3 काँग्रेस 11
4 राष्ट्रवादी काँग्रेस 40
5 मनसे 2
6 इतर 1
एकूण 162

 

  1. पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी 804 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 9
2 भाजप 78
3 काँग्रेस 0
4 राष्ट्रवादी काँग्रेस 35
5 मनसे 1
6 इतर 5
एकूण 128

 

  1. सोलापूर महापालिका

सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 478 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 20
2 भाजप 47
3 काँग्रेस 14
4 राष्ट्रवादी काँग्रेस 4
5 मनसे 0
6 इतर 17
एकूण 102

 

  1. अकोला महापालिका

अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी 579 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 8
2 भाजप 48
3 काँग्रेस 13
4 राष्ट्रवादी काँग्रेस 5
5 मनसे 0
6 इतर 6
एकूण 80

 

  1. अमरावती महापालिका

अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी 626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 7
2 भाजप 45
3 काँग्रेस 15
4 राष्ट्रवादी काँग्रेस 0
5 मनसे 0
6 इतर 20
एकूण 87

 

  1. नागपूर महापालिका

नागपूर महापालिकेच्या 155 जागांसाठी 774 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकांनी दिलेला कौल पुढीलप्रमाणे

क्रमांक पक्ष जागा
1 शिवसेना 2
2 भाजप 108
3 काँग्रेस 29
4 राष्ट्रवादी काँग्रेस 1
5 मनसे 0
6 इतर 11
एकूण 151