केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०१७:
परवडणाऱ्या गृह प्रकल्पांमध्येच स्थावर मालमत्ता क्षेत्राचे भविष्य आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता विकासकांनी मोठ्या प्रमाणात परवडणारे प्रकल्प उभारावेत, असे प्रतिपादन गृह आणि शहर द्रारिद्रय निर्मूलन मंत्री वैंकय्या नायडू यांनी केले. नवी दिल्ली इथे मंगळवारी स्थावर मालमत्ता क्षेत्रासंबंधातल्या एका परिषदेमध्ये बोलत होते.
- प्रधानमंत्री आवास योजना(शहर) अंतर्गत मदत
स्थावर मालमत्ता क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मागील दोन वर्षात या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी 20 हून अधिक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना(शहर) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक 2 लाख 35 हजार रुपयांच्या केंद्रीय सहाय्यासाठी पात्र ठरतील, असेही त्यांनी सांगितले.
- १६ लाख परवडणाऱ्या घरांना परवानगी
गृह आणि शहरी द्रारिद्रय निर्मूलन मंत्रालयाने आत्तापर्यंत शहरी गरीबांसाठी 16 लाख परवडणारी घरं बांधण्याला परवानगी दिली आहे. यामध्ये 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. ज्यात 25 हजार कोटी रुपयांचे केंद्रीय सहाय्य असेल,अशी माहिती त्यांनी दिली.
खाजगी विकासकांनी आत्तापर्यंत अशा प्रकारचे गृह प्रकल्प उभारले नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. खाजगी विकासकांनी आपला दृष्टीकोन बदलण्याची विनंती नायडू यांनी यावेळी केली.