नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2017
नीति आयोगाच्या भाग्यशाली ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजना या दोन प्रोत्साहन पर योजनांच्या माध्यमातून भारतात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ही योजना कार्यान्वित करणाऱ्या एन पी सी आय ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 20 फेब्रुवारी 2017 पर्यंत सुमारे 10 लाख ग्राहक आणि व्यापाऱ्यांना 153.5 कोटी रुपयांचे बक्षिस वितरीत केले आहे.
या उपक्रमाच्या केवळ 58 दिवसांमध्येच लोकांनी या दोन्ही योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक लोकांनी डिजिटल पद्धतीने व्यवहार करायला सुरुवात केली आहे.
महत्वाचे मुद्दे
- 8 लाख विजेत्यांमध्ये 9.2 लाख ग्राहक तर 56 हजार व्यापारी आहेत.
- 120 ग्राहकांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस जिंकले.
- 4 हजार दुकानदारांनी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे रोख रकमेचे बक्षिस जिंकले.
- सर्वाधिक विजेत्यांसह महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश,दिल्ली क्रमश: पहिल्या पाच क्रमांकावर
- या योजनांमध्ये महिला आणि पुरुषांचा सक्रिय सहभाग .
- विजेत्यांमध्ये शेतकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी ते निवृत्त लोकांचा समावेश.
- सर्वाधिक विजेते 21 ते 30 वर्ष वयोगटातील आहेत.