नवी मुंबई,21 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावर साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. जबलपुर-कोइम्बतूर-जबलपुर साप्ताहिक सुफरफास्ट आणि गांधीधाम- तिरुनवेली- गांधीधाम विशेष अशा गाड्या असून कोकणातील अनेक स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
- गाडी क्रमांक 02198 जबलपुर-कोइम्बतूर ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 11 मार्च ते 3 जून या काळात प्रत्येक शनिवारी सकाळी 11 वाजता जबलपुरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता कोइम्बतूरला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 02197 कोइम्बतूर-जबलपुर ही गाडी 13 मार्च ते 5 जून या काळात प्रत्येक सोमवारी सायंकाळी 7 वाजता कोइम्बतूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10.20 ला जबलपुर स्थानकात पोहोचेल.
- थांबे-
या गाड्यांना नरसिंगपुर, गदरवारा, पिपारिया, इटारसी, हर्डा, खांडवा, भुसावळ, मनमाड, इगतपुरी, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, मूकाम्बिका रोड, बायंदूर, उडुपि, मुल्कि, मंगलोर जंक्शन, कासारगड, कहानगड,पाय्यनुर,कन्नुर, थलासेरी, वडाकारा, कोझिकोड, त्रिरुर, शोरानुर जंक्शन आणि पलघाट स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.
- गाड्यांना डबे
या एक्सप्रेस गाड्यांना 18 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये एसी 3 टायर व एसी 2 टायर यांचा एकत्रित 1 डबा, एसी 3 टायर 1 डबा, स्लीपर 10 डबे, 4 जनरल डबे, एसएलआर 2 डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक09458 गांधीधाम –तिरुनवेली ही विशेष गाडी 10 एप्रिल ते 5 जून या काळात प्रत्येक सोमवारी दुपारी 1.50 ला गांधीधाम स्थानकातून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता तिरुनवेली स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09457 तिरुनवेली- गांधीधाम ही विशेष गाडी 13 एप्रिल ते 8 जून या काळात प्रत्येक गुरुवारी सकाळी 7.45 ला तिरुनवेली येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 4.30 ला गांधीधाम येथे पोहोचेल.
- थांबे
या गाड्या भचौ ,समखिआली जंक्शन, धरांगधरा जंक्शन,विरंगम, अहमदाबाद, नादिआड, आनंद, वडोदरा, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळुण,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, उडुपि, मंगलोर जंक्शन, कासारगड, कन्नुर, कोझिकोड, त्रिरुर, शोरानुर जंक्शन,त्रिसुर, एर्नाकुलम जंक्शन, अल्लेपी, कोलाम, त्रिवेंद्रम, नागरकोईल टाउन आणि वाल्लियुर स्थानकात थांबविण्यात येणार आहेत.
- गाड्यांना डबे
या विशेष गाड्यांना 16 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये एसी 2 टायर 1, एसी 3 टायर 5, स्लीपर 6, जनरल 2 आणि एसएलआर 2 डबे असणार आहेत.