ठाणे:चारही जागांसाठी मतदान अनिवार्य

 

ठाणे,18 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिा सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये प्रत्येक प्रभागात बहुसदस्यीय पध्दत आहे. त्यामुळे एका प्रभागातून मतदाराला एकूण चार जागा असून या चारही जागांसाठी मतदान करणे अनिवार्य असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .

मतदान केंद्रावर असलेल्या बॅलेट युनिट मशिनवर सर्व मतदारांना समजेल, अशी सोपी रचना करण्यात आली आहे.

चार जागाकरिता मतपत्रिकांसाठी 4 रंगाची निवड करण्यात आली आहे.

  • जागा अ- पांढ़रा रंग : मतदारांनी जागा ‘अ’ जागेसाठी मतदान करतांना ‘ पांढ़-या ‘ रंगाच्या मतपत्रिकेवरील पंसतीच्या उमेदवाराचे निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबावयाचे आहे.
  • जागा ब- गुलाबी रंग : ‘ब’ जागेसाठी ‘ गुलाबी ‘ रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवार निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबावयाचे आहे.
  • जागा क- पिवळा रंग : ‘क’ जागेसाठी ‘ पिवळ्या ‘ रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारांचे निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबावयाचे आहे
  • जागा ड – फिकट निळा रंग : ‘ड’ जागेसाठी फिकट निळा ‘ रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारांपैकी निवडणूक चिन्हासमोर बटण दाबावयाचे आहे.
  • नाटो चा पर्याय

एखाद्या मतदारास अपवादात्मक परिस्थितीत नापसंती दर्शवावयाची असेल तर त्यांना NOTA (None of the above) या बटणाचा वापर करण्याची सुविधा प्रत्येक जागेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

  • तर मते बाद ठरतील

एका मतदाराने चारही जागाकरीता मतदान करावयाचे आहे. चार जागांसाठी मतदाराने प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील एक मत असे चार वेळा मतदान (बटण दाबावे) करावे. एका मतदाराने चार पेक्षा कमी मत दिल्यास,  देण्यात आलेली मतेदेखील ग्राह्य धरली जाऊ शकणार नाहीत. किंवा त्याच्या मताची मशीनमध्ये नोंद होणार नाही . मतदाराने चारही जगासाठी मतदान केल्यानंतर आवाज आल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

  • दरम्यान प्रभाग क्रमांक २९ मध्ये मात्र मतदारांना तिचं जगासाठी मतदान करावचाचे आहे .तीन पक्ष कमी जगासाठी मतदान केल्यास त्यांचे मत ग्राह्य धरले जाणार नाही असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट केले आहे.