चेकपोस्ट नाक्यावर 4 लाख 61 हजार जप्त

tolnaka

ठाणे, 18 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक  2017 करीता आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्‍या बाळकुम चेकपोस्ट पथकामार्फत आज सकाळी भिवंडीवरुन बाळकुम नाक्‍याकडे येणा-या रेंज रोव्हर गाडीमधून रक्कम 4 लाख 61 हजार 880 रुपये एवढी रोख रक्कम जप्त करण्‍यात आली आहे. पोलीस तपासानंतर ही रक्कम अधिक तपासासाठी आयकर खात्याच्या अन्‍वेषण विभागाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात येणार आहे.

whatsapp group अ‍ॅडमीन विरोधात गुन्हा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल मुंब्रा पोलीस ठाण्यात एका whatsapp group अ‍ॅडमीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शमिन खान इत्तेहात वेल्‍फेअर ट्रस्ट, शिळ मुंब्रा यांच्‍या तक्रारीच्‍या आधारे सोशल मिडीयाद्वारे मतदारांच्‍या भावना भडकविण्यास कारणीभूत असलेला मजकूर whatsapp group वर प्रसारीत केल्‍याबद्दल आचारसंहिता पथक प्रमुख प्रभाग क्र.29, 33 यांनी मुंब्रा पोलीस स्‍टेशनला Awareness whatsapp group अ‍ॅडमीन तरबेज कुरेशी राहणार मुंब्रा यांच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या मूळ बॅनरमध्‍ये फेरफार करुन आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयाद्वारे प्रसारित केल्‍याबद्दल गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.