1ल्या टप्प्यात 65% मतदान झाल्याचा अंदाज

 

15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी निवडणूक

मुंबई,16 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शांतते मतदान झाले. या निवडणुकीत सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाल्याचा अंदात वर्तविण्यात येत आहे. मात्र अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त झालेली नाही. जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतचे निवडणूक विभागांसाठी आज मतदान झाले

15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जिल्हा परिषदांतर्गत 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

संध्याकाळी साडेपाचपर्यंत झालेली मतदानाची सरासरी टक्केवारी –

बीड – सुमारे 65 टक्के

नांदेड- सुमारे 60 ते 65 टक्के

लातूर – सुमारे 60 ते 65 टक्के

यवतमाळ – सुमारे 70 टक्के

गडचिरोली – सुमारे 70 ते 75 टक्के

संध्याकाळी साडेतीनपर्यंत झालेली मतदानाची सरासरी टक्केवारी –

उस्मानाबाद – सुमारे 53 टक्के

परभणी – सुमारे 54 टक्के

चंद्रपूर – सुमारे 54 टक्के

जळगाव –सुमारे 46 टक्के

औरंगाबाद – सुमारे 48 टक्के

जालना – सुमारे 57 टक्के

हिंगोली –सुमारे 54 टक्के

बुलढाणा – सुमारे 49 टक्के

वर्धा –सुमारे 46 टक्के