ठाणे,15 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 21 फेब्रुवारीला होणार असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशनाने 17 फेब्रुवारीला होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
ठाणे शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व स्टेम प्राधिकरण कंपनी यांच्यामार्फत पाणी पुरवठा केला जातो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 फेब्रुवारीला करण्यात येणारी पाणी कपात रद्द करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी सुरु राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.