नवी मुंबई, 15 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
वाशीच्या एपीएमसीमध्ये कांदा,बटाट्याचे दर घसरले आहेत. बाजारात आवक वाढली असून उठाव कमी असल्यामुळे कांदा, बटाट्याचे दर घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
एपीएमसीच्या बाजारात आज एक किलो कांद्याला 5 ते 6 रुपये तर बटाट्यालाही किलोमागे 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. आज एपीएमसीमध्ये कांद्याच्या 100 तर बटाट्याच्या 60 गाड्यांची आवक झाली. त्यातही काल आलेल्या बटाट्याच्या 150 गाड्यांपैकी 50 ते 60 गाड्या बाजार आवारात उभ्या अाहेत. त्यामुळे त्यामुळे बटाट्याचा विक्री कमी झाल्याची माहिती कांदा बटाटा आडत व्यापारी संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत रामाणे यांनी दिली.
सध्या नाशिक, पुणे,सोलापूर, नगर आदी भागातून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रातूनही बटाट्याची आवक होत आहे. कांदा, बटाट्याचे घर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांना एक किलो कांद्यासाठी 3 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गही हवालदिल झाल्याचे रामाणे यांनी सांगितले.