नवी मुंबई, 13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापौर बुद्धीबळ स्पर्धेच्या पुरूष आणि महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे मिथिल आजगांवकर आणि वैभवी जाधव यांनी पटकावले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 11 व 12 फेब्रुवारी ऐरोली,सेक्टर 3 येथील श्रीराम विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर सुधाकर सोनवणे आणि अन्य मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
बुद्धीबळ स्पर्धेतील विविध गटातील पहिले चार खेळाडू पुढीलप्रमाणे-
- खुल्या पुरुष गट
1.मिथिल आजगांवकर, 2.केतन बोरीचा, 3. संजिव नायर, 4. ओमकार कडव
- खुला महिला गट
1.वैभवी जाधव, 2. समिक्षा पाटील, 3. अलाना विन्सेंट, 4. आकांक्षा निकम
- 9 वर्षाखालील मुले
1.यश राणे, 2. यशसिंग नेगी, 3. हरीष इनामदार, 4. आरुष साळवी
- 9 वर्षाखालील मुली
1.पल्लवी यादव, 2. सनिधी भट, 3. मृगया गोटमारे, 4. प्राप्ती नाईक
- 11 वर्षाखालील मुले
अर्णव नेहते, 2. लक्ष कदम, 3. निळकंठ श्रेय, 4. हेम सोट्टा
- 11 वर्षाखालील मुली
1.सौख्यी सावंत, 2. तन्वी बोराटे, 3. सायना चोप्रा , 4. निधी मिश्रा
- 15 वर्षाखालील मुले
1.अथर्व जाईल, 2. हर्ष नेगी, 3. आयुष दिपनाईक, 4. अरिंजय ठाकुर
- 15 वर्षाखालील मुली
1.निशिगंधा रामगुडे, 2. अनुष्का मेनन, 3. वेदीका मिश्रा, 4. ग्रीष्मा धुमाळ
दोन दिवस चाललेल्या या बुध्दीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यासोबत पालकांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.