मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा आरोप
मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/A News Bureau:
शिवसेना व भाजप यांची गेली २० वर्षे महानगरपालिकेत सत्ता होती. दोघांनी मिळूनच रस्ते दुरुस्ती घोटाळा,नालेसफाई घोटाळा, कचरा घोटाळा असे अनेक घोटाळे केले. शिवसेनेच्या सर्व घोटाळ्यांना भाजपने नेहमीच साथ दिली व समर्थन दिले. मुंबईकरांच्या मूलभूत सोई-सुविधा पूर्ण करू शकले नाहीत. ते संपूर्ण अपयशी ठरलेले आहेत. आता एकमेकांवर दोघे आरोप करत आहेत. हे मुंबईकरांची दिशाभूल करण्यासाठी आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम धारावी येथील जाहीर सभेत केला.
आगामी मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याचे त्यांनी आवाहन केले. काँग्रेसची सत्ता आल्यावर स्वच्छ, मुबलक व मोफत पाणी, २४ तास पाणी, चांगले रस्ते व कचरामुक्त आणि स्वच्छ मुंबई देण्याचे संजय निरुपम यांनी आश्वासन दिले.
धारावीतील या सभेमध्ये माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड तसेच या विभागातील काँग्रेसचे सात ही उमेदवार उपस्थित होते.