नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबईतील ज्येष्ठ कवी नरेंद्र शंकर घाटे यांच्या ” सांगे कबीर ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील श्री. कौपिनेश्वर मंदिरा मध्ये निवेदिका धनश्री लेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौपिनेश्वर मंदिर कमटीचे अध्यक्ष सुहास बाकरे उपस्थित होते. संत कबीर यांच्या साहित्याचा मराठी अनुवाद या पुस्तकातून करण्यात आला आहे. नरेंद्र घाटे यांनी अमराठी वाड्मयाचा मराठी वाचकांना परीचय करून देण्याच्या उद्देशाने आजवर रविंद्रनाथ टागोर, गटे, भरतृहरी यांच्या काव्याचा मराठी अनुवाद केला आहे.