नवी मुंबई, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
कोपरखैरणे व घणसोली विभागात रस्त्यावरील फेरीवाल्यांवर तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणा-या व्यावसायिकांवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आज धडक कारवाई केली.
महापालिका प्रशासनाच्यावतीने अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत घणसोली आणि कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 2 चे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. आयुक्त अशोक मढवी, दत्तात्रय नागरे, प्रकाश वाघमारे यांच्या माध्यमातून रस्त्यावरील फेरीवाल्यांवर तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणा-या व्यावसायिकांवर मोठ्या स्वरूपाची धडक कारवाई करण्यात आली.
या मोठ्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला 5 ट्रक माल डंपिग ग्राऊंडला जमा करण्यात आला आहे. तसेच फुटपाथवरील टपऱ्याही मोठ्या प्रमाणावर काढून टाकण्यात आल्या.