तीन पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा

नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र पोलीस सेवेतील तीन अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा प्रदान करण्यात आला आहे. सुरेश मेंगडे, अरविंद साळवे आणि सुधाकर पाठारे अशी या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहे. केंद्रीय गृहविभागाने याबाबतचा आदेश 6 फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे.

उपायुक्त सुरेश मेंगडे आणि उपायुक्त अरविंद साळवे हे दोन्ही अधिकारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. तर सुधाकर पाठारे हे सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.