ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांचा इशारा
ठाणे, 7 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूकीचे काम नाकारणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017 सुरळीत पार पाडण्यासाठी मोठया प्रमाणावर मुनष्यबळाची गरज लक्षात घेता प्रशासनाने मोठया प्रमाणावर यंत्रणा उभारली आहे. यासाठी शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी शाळांमधील कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश प्रशासनाच्यावतीने बजावण्यात आले आहेत.
निवडणूक हा कामकाजाचा अविभाज्य भाग असून प्रत्येक कर्मचा-याने निवडणूकीचे नेमून दिलेले काम करणे हे बंधनकारक आहे. निवडणूकीचे आदेश नाकारणा-या अधिकारी कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.