भाजपच्या प्रचाराला आजपासून सुरूवात

मुंबई , 5 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.

मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज दादर वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या प्रचार रणनितीची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या भागात निवडणूका आहेत त्या भागातील सर्व जनतेला भाजप च्या  जाहिरनाम्याबाबात आपल्या अपेक्षा आणि सुचना पाठवा असे आवाहन सोशल मिडीयावरून केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे सहा लाखाहून अधिक सुचना आल्या आहेत. त्या सर्व सुचनांचा विचार करून भाजप चा जाहिरनामा तयार करण्यात येतो आहे.

भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार आज दुपारी २ वाजता हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे होणाऱ्या मेळाव्यात पारदर्शी भष्टाचार मुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत, असेही शेलार यांनी सांगतिले.