भाजपतर्फे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

पनवेल, 3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या, 4 फेब्रुवारीला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यावेळी  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

येत्या 21 फेबु्रवारीला रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  पनवेल तालुक्यात गव्हाण, गुळसुंदे,  वावंजे,  नेरे, वडघर, केळवणे, पालीदेवद, पळस्पे या आठ जिल्हा परिषद व वांवजे, चिंध्रण, नेरे, आदर्इ,पालीदेवद, विचुंबे, पळस्पे,कोन,पोयंजे,गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा या सोळा पंचायत समितींचा समावेश आहे.