ठाण्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे, 3फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका 31 वर्षीय पुरूष रुग्णावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पोटातील 8 किलो वजनाचा टयूमर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
सर्जरी विभागप्रमुख डॉ अरुण माने व त्यांचे सहकारी सर्जरी तज्ज्ञ डॉ. अय्यर, डॉ. अमोघ वैशंपायन, डॉ. नुपूर व बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा सावंत, डॉ. विजय आदी पथकांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
काही दिवसांपूर्वी 31 वर्षीय रुग्ण पोटाचे उपचार घेण्यासाठी छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी या रुग्णाच्या पोटातून 36 x 28 x 20 से.मी आकाराचा व 8 किलो वजनाचा टयूमर काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पार पाडली.
अशा प्रकारच्या टयूमरचे प्रमाण हे महिलांमध्ये जास्त् असून पुरुषांमध्ये ते क्वचितच आढळते. या ट्यूमरचे नेमके स्वरुप जाणून घेण्यासाठी आवश्यक चाचण्या रुग्णालयातच केल्या गेल्या. त्यानंतर रुग्णावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.राजीव कोर्डे यांनी सांगितले.