पनवेल, 1 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
सिडकोने जिते येथे हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी व आजूबाजूची गावे या भागांतील पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 9 पासून ते शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2017 पर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.