नवी मुंबई, 31 जानेवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई शहरातील महिला वसतीगृह आणि शाळा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.
30 जानेवारी रोजी तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील तेजस्विनी वर्किंग हॉस्टेल व वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा येथील महिला वसतीगृह व परिसराची विद्यार्थींनींच्या सहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता गृहाची पाहाणी करुन दुरुस्ती करण्यात आली तसेच प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी तुर्भे विभागातील उप मुख्य स्वच्छता अधिकारी के.के. मोरे, स्वच्छता निरिक्षक विजय पडघन, उप स्वच्छता निरिक्षक संजय पाटील, किरण सोलसकर व मनोज मोहीते, विद्यार्थी व स्वच्छाग्रही तसेच परिसरातील नागरीक उपस्थित होते.
31 जानेवारी रोजी वाशी विभागातील शंकरराव विश्वासराव विद्यालय शाळा क्र.28 मध्ये विद्यार्थीनींकरीता असलेल्या स्वच्छता गृहाची व शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाशी विभागातील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढाल, संतोष देवरस, यश पाटील, जयेश पाटील, विभागातील उप स्वच्छता निरिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.