ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे आवाहन
ठाणे, 27 जानेवारी 2017/AV News Bureau :
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातंर्गत शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी आर.टी.ई.अंतर्गत 25% प्रवेशाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज वितरिण व स्विकृत ऑनलाईन पध्दतीने
- 5 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे,
- 27 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारीदरम्यान पहिली लॉटरी काढणे
- 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया
या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करावयाचे नसून निवड झाल्यानंतर अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडायची आहेत.
- जातीचा दाखला (फक्त वंचित घटक),
- उत्पन्नाचा दाखला (फक्त दुर्बल घटक),
- रहिवासाचा/ निवासाचा पुरावा (वंचित व दुर्बल दोन्ही गटांसाठी),
- बालकाचा जन्मतारखेचा दाखला/पुरावा (वंचित व दुर्बल दोन्ही गटांसाठी),
- बालकाचा पासपोर्ट फोटो (वंचित व दुर्बल दोन्ही गटांसाठी),
- अपंगत्वाचा पुरावा