नवी मुंबई, २६ जानेवारी २०१७ /AV News Bureau:
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, आरोग्य समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका नेत्रा शिर्के, सरोज पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच 300 हून अधिक बाईकर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताकदिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई 25 ते 27 जानेवारी 2017 या कालावधीत केली जात असून तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी अनेक नागरिक महापालिका मुख्यालय परिसराला आवर्जून भेट देत आहेत.