राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नवी मुंबई, 26 जानेवारी 2017/AV News :
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ आज नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथील मैदानावर साजरा झाला. महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झाले.
या समारंभास आ. मंदा म्हात्रे, कोंकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) प्रशांत बुरुडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, कोकण विभागीय अपर आयुक्त हिरालाल सोनावणे,नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्य राखीव पोलीस पथक,जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस महिला पथक, नवी मुंबई पोलीस प्लाटून, नवी मुंबई पोलीस वाहतूक पथक, अग्निशमन दल पथक , नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, मार्क्स मॅन वाहन, आर.आय.व्ही. वाहन , वज्र वाहन, बी.डी.डी.एस.वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, बुलेट प्रुफ वाहन, अग्निशमन फायर रेस्क्यु टेंडर व ज्ञानपुष्प विद्यानिकेतन,सीबीडी बेलापूर, ज्ञानमंदिर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कळंबोली, नवी मुंबई विद्यालय, वाशी, सुधागड एज्युकेशन सोसायटी, कळंबोली या विद्यालयाच्या विद्यार्थी आदिंनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्या विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र.6, करावे, एस.एस.हायस्कूल, सिवूड, नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र.4, ज्ञानपुष्प विद्यानिकेतन, सीबीडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने, उपायुक्त (महसूल) भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (रोहयो) मिलींद पाठक, उपायुक्त (आस्थापना) रविंद्र शिंदे, उपायुक्त (पुर्नवसन) अरुण अभंग, उपायुक्त (पुरवठा) गीतांजली बावीस्कर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.