ठाणे, 25 जानेवारी 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे आज 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 65 उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार असून 31 जानेवारीपर्यंत सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि प्रभाग –
अड.श्रीकांत कोळेकर (3)
लक्ष्मण मोरे (3)
हेमंत शर्मा (4)
सुरेश शेलार (6)
सुभाष तायडे (6)
प्रमिला राठोड (6)
श्रीमती मिरा आयरे (15)
बुद्धा मेश्राम (20)
गिरिश साळगावकर (20)
उन्मेश बागवे (21)
अनिल शाळीग्राम (22)
सुरेन कोळी (22)
सुनिल कर्णिक (23)
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, नियोजन शुन्य विकास योजना, प्रशासनाची दादागिरी, नगरसेवकांची अकार्यक्षमता आदी गोष्टींमुळे शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे लोकांमधूनच उमेदवार उभे करून लोकांनीच आपल्या शहराचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठीच ठाणे मतदाता जागरण अभियान सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे लोकांमधूनच उमेदवार निवडणूक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे या अभियानाचे समन्वयक उन्मेष बागवे यांनी सांगितले.