ठाणे, 24 जानेवारी 2017/AVIRAT VAATCHAL NEWS:
ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे भंग करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महापालिका मुख्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक 2017 ची आचारसंहिता दिनांक 11 जानेवारी 2017 पासून लागू करण्यारत आली आहे. राज्या निवडणूक आयोगाच्याल आदेशानुसार सदर निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी तक्रार निवारण कक्ष महापालिका मुख्यायलयात स्था्पन करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात जे. एन.एन.यु.आर.एम.कार्यालयात (पाचपाखाडी ठाणे), दुसरा मजला येथे तक्रार निवारण कक्ष, 24 तास (24×7) कार्यरत राहणार आहे.
आचारसंहितेबाबतच्या तक्रारी करण्यासाठी नागरिकांनी 25343463 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.