60 कोटींहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी
नवी मुंबई, 24 जानेवारी 2017/ AVIRAT VAATCHAL NEWS :
नवी मुंबई महापालिकेचा 1 लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकबाकी असणा-या 8800 जणांची यादी पालिका प्रशासनाने तयार केली आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकविणा-या 23 थकबाकीदारांवर आज मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. या 23 थकबाकीदाकडे एकूण थकीत रक्कम 60 कोटी 94 लक्ष 17 हजार 275 इतकी असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिका प्रशासनाने 830 मोठ्या थकबाकीदारांना थकबाकीसह मालमत्ता कर भरण्यासाठी 48 तासांची नोटीस बजावली आहे.
महापालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेली 23 थकबाकीदारांची यादी
- सेक्टर11 बेलापूर येथील मे. अपारंता प्रा.लि.,
- बेलापूर रेल्वे स्टेशन इमारतीतील मे.इस्मार्ट इंटरनॅशनल लि.
- बेलापूर रेल्वे स्टेशन इमारतीतील मे. रोग्ये चॅरीटिज,
- नेरुळ येथील मे. अमर वायर रोप्स प्रा.लि.,
- नेरुळ एम.आय.डी.सी.तील मे. हर्डिलीया युनिमर्स लि.,
- सेक्टर28 वाशी येथील शेठ अक्षय हर्षद राय,
- एम.आय.डी.सी. तुर्भे येथील मे. ब्युटी आर्ट प्रोसेसर्स प्रा.लि.(2 स्वतंत्र मालमत्ता),
- एम.आय.डी.सी. तुर्भे येथील मे. मयुर कोल्ड प्रा.लि.,
- सेक्टर19 डी तुर्भे येथील मे. व्हेल विशर प्रा.लि.,
- कोपरखैरणे येथील मे. रिअल व्हॅल्यु अप्लायन्सेस,
- कोपरखैरणे येथील मे. प्रेस्टिज प्लास्ट ॲण्ड केम प्रा.लि.,
- कोपरखैरणे येथील मे. फोनिक्स ॲल्कॅमी प्रा. लि.,
- कोपरखैरणे विभागातील मे. फ्युटेक पार्क(इंडिया) प्रा.लि.,
- रबाळे एम.आय.डी.सी.तील मे. हर्डिलिया पॉलिमर्स लि.,
- घणसोली सेक्टर11 येथील मे. सत्यम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स,
- घणसोली एम.आय.डी.सी.तील मे. गोल्चा मिनरल्स प्रा.लि.,
- सेक्टर9 ऐरोली येथील गुरुदास पाटील,
- सेक्टर20 ऐरोली येथील सदाशिव पाटील,
- दिघा येथील मे. प्रेसिशन फास्टनर लि.,
- दिघा येथील मे. ज्योती बेकर्स,
- दिघा येथील मे. एम्को इलेक्ट्रिकल्स,
- दिघा येथील मे. महाराष्ट्र रोलर फ्लोअर मिल
या थकबाकीदारांना आपली रक्कम भरणा करण्यासाठी 31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई टप्प्या-टप्प्याने र करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.