वॉशिग्टन. 24 जानेवारी 2017:
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प आज दुपारी 1 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता मोदींशी फोनवरून बोलणार आहेत. व्हाइट हाउसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
भारतासोबत भविष्यात आर्थिक तसेच विविध पातळ्यांवर काम करण्यासाठी अमेरिका उत्सुक असल्याचे दिसून येते. यापार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून होणारे बोलणे अधिक महत्वाचे मानले जात आहे.
20 जनेवारी रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आतापर्यंत चार देशांच्या राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी हे पाचवे नेते ठरणार आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी 21 जानेवारी रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रडेऊ आणि मेक्सिकोचे पंतप्रधान पेना निएटो यांची चर्चा केली. त्यानंतर रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु आणि काल सोमवारी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल सिसि यांच्यांशी फोनवरून चर्चा केली.
अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या विजय मिळविल्यानंतर जगभरातील पाच नेत्यांनी त्यांना लगेचच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.