कोपरखैरणे व घणसोली येथे अतिक्रमण विरोधी कारवाई

नवी मुंबई, 24 जानेवारी 2017/AVIRAT VAATCHAL NEWS:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत आज कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर 5 कोपरखैरणे येथील भूखंड क्र. 39 वर बांधण्यात येत असलेल्या अनधिकृत 3 मजली इमारतीवर नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी क्रशर मशीन, पोकलेन, डंपर, जे.सी.बी. या उपकरणांच्या सहाय्याने ही धडक मोहीम पार पाडली.

अशाचप्रकारे घणसोली विभागाचे सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे यांच्या माध्यमातून घणसोली – अर्जुनवाडी येथील 8 बैठी घरे निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात आली.