प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई

नवी मुंबई, 23 जानेवारी 2017 / AV News Bureau :

नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर आज कारवाई करण्यात आली.

बेलापूर व नेरूळ येथील आरती डेअरी, गोकुळ डेअरी, अंबिका डेअरी, जय श्रीनाथ डेअरी, विनायक डेअरी, जय महालक्ष्मी डेअरी या दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे नेरुळ, सेक्टर 29 मधील बस डेपो समोरील फेरीवाला भूखंड येथील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.

अशाप्रकारची प्लास्टिक विरोधी मोहीम संपूर्ण नवी मुंबई शहरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी / कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.