वर्षभरात 24 लाख 42 हजार 750 रुपये दंड वसूल
नवी मुंबई महापालिका प्रशासनाची मोहिम
स्वप्ना हरळकर /AV News
नवी मुंबई, 23 जानेवारी 2017
नवी मुंबईत स्वच्छ भारत अभियान जोमाने राबविण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र शहरात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांमुळे या मोहिमेला बाधा येत आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात पालिकेच्या भरारी पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या तब्बल 8 हजार 803 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 24 लाख 42 हजार 750 रुपये इतका दंड वसूल केला आहे.
महापालिकेच्यावतीने स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त नवी मुंबईसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना अटकाव व्हावा यासाठी महापालिकेने उपद्रव शोधपथकांची निर्मिती केली आणि परिमंडळ 1 व परिमंडळ 2 मधील विभागांमध्ये तैनात केली. त्याचा परिणाम वर्षभरात परिमंडळ -1 मध्ये 4 हजार 908 आणि परिमंडळ -2 मध्ये 3895 असे तब्बल 8 हजार 803 जण उपद्रव पथकाच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर कारवाई करून 24 लाख 42 हजार 750 दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
परिमंडळ -1 मध्ये उपद्रव शोधपथकाने केलेली कारवाई
परिमंडळ -2 मध्ये उपद्रव शोधपथकाने केलेली कारवाई