सारवाक(मलेशिया), 22 जानेवारी 2017 :
भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतपदावर आपली मोहोर उमटवली आहे. दुखापतींमुळे मागील काही महिन्यांत हुलकावणी देणारं यश तिने खेचून आणल्यामुळे तिच्या निवृत्तीची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.
मलेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपॉवी चोचूवोंगला हिचा २२-२०, २२-२० असा सरळ दोन सेटमध्ये परावभ केला आणि या वर्षीतील पहिल्या वहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
गेले वर्षभर सायना दुखापतींमुळे बेजार झाली होती. स्पर्धांमध्ये यश मिळत नव्हते. त्यामुळे सायना निवृत्ती घेणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलेशिया मास्टर्सच्या विजेतेपदामुळे आपले बॅडमिंटन अद्याप संपलेले नाही, असेच जणू तिने दाखवून दिले आहे.