मुंबई, 21 जानेवारी 2017: भारत पाकिस्तान सीमारेषेवर पेट्रोलिंग करत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांना आज दुपारी पाकिस्ताने भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले आहे. वाघा सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या अधिका-यांसमक्ष त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
चव्हाण जम्मू- काश्मिरमधील मंढेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर गस्तीसाठी तैनात होते. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चव्हाण सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. पाक सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ते पाकिस्तानात असल्याचे पाकिस्तान डीजीएमओंनी सांगितले होते. चुकून पाकिस्तानात गेल्याचे भारत सरकारकडून पाकिस्तान सरकारला सांगण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत होते. अखेर आज पाकिस्तानने त्याची सुटका केली आहे.