रामदास आठवले यांनी आरएसएसला सुनावले
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2017:
जातीवर आधारीत आरक्षण हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे दलित आदिवासींच्या आरक्षणाचा घटनात्मक अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न झाला तर त्यास तीव्र विरोध करु, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिला आहे.
आरएसएसचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्या आरक्षण बंद करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आरक्षण बंद करण्याची आरएएसच्या प्रचारप्रमुखांची मागणी चुकीची आहे. आरक्षण बंद करण्याची भूमिका आरएसएसची असू शकते. मात्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची आरक्षणाच्या अनुकूल भूमिका आहे. असे सांगत देशात जोपर्यंत जातिव्यवस्था आहे जातिभेद आहे तोपर्यंत जाती आधारित आरक्षण राहील. आरक्षण बंद करण्याची भूमिका घेण्याआधी देशातील जातिव्यवस्था नष्ट करण्याची भूमिका आरएसएस ने घ्यावी, असेही आठवले यांनी आरएसएसला सुनावले.