30 जानेवारीपासून राज्यात न्यायसहायक जागृती सप्ताह

मुंबई, 21 जानेवारी 2017/ AV News Bureau:

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील विश्लेषणात्मक कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिक तसेच इतर राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील अधिकारी यांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील सर्व न्यायसहायक प्रयोगशाळांमध्ये संचालनालयाच्यावतीने 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान न्यायसहायक जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. न्यायसहायक जागृती सप्ताहाच्या या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, इतर राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलीस अधिकारी व अभियोग न्यायालयासंबंधी असलेल्या अभियोक्ता, राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, न्यायसहायक विज्ञान व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या शिक्षणार्थीनी त्यांच्या महाविद्यालयामार्फत/विद्यापीठामार्फत त्या त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेस भेट देण्यासाठी मुंबई- 022-26670755/ 26670965/26674157, नागपूर- 0712-2462879/2042979, पुणे-020-25654772, औरंगाबाद-0240-2370375, नाशिक-0253-2620628, अमरावती- 0721-2552692, नांदेड- 02462-236631/233631 आणि कोल्हापूर- 0231-2535360/2535361 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन माहिती महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) प्रभात रंजन यांनी केले आहे.