मुंबई, 21 जानेवारी 2017/ AV News Bureau
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) व उद्योग संचालनालय (मुप्रावि) मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यां महिला/पुरुष यांच्याकरिता मुंबई येथे 1 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकीय गुण, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, उद्योगासाठी लागणारे आवश्यक परवाने व नोंदणी, कर्ज प्रकरण तयार करण्याची प्रक्रिया व सादरीकरण व बँकेची कार्यपद्धती, संभाषण कौशल्य, मुलाखत कौशल्य, वेळेचे नियोजन, परिकल्पकता, कारखाना भेटी, व्हिडियो क्लिपद्वारे प्रात्यक्षिक, शासकीय कर्ज योजनांची माहिती, तज्ज्ञ व्यक्तीमार्फत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)चे प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क 6500 रुपये आकारण्यात येईल. यामध्ये एका वर्षासाठी उद्योजक मासिक सेवाकर यांचा समावेश असेल.
अधिक माहितीसाठी व प्रवेश अर्जासाठी के.व्ही.राठोड, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी मुंबई व वर्षा धारकर (ऑफिस असिस्टंट) यांच्याशी उद्योग सहसंचालक (मुप्रावि) द्वारा औद्योगिक रसायन प्रयोगशाळा बिल्डिंग, पहिला मजला, व्हि.एन. पुरव मार्ग, टाटानगर, चुनाभट्टी पूर्व, मुंबई-२२ येथे सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन के.व्ही.राठोड, प्रकल्प अधिकारी,एमसीईडी, मुंबई यांनी केले आहे. संपर्कासाठी क्रमांक : ९२०९०११२६८/ ९४०३०७८७७३/ ९८६७८८३६७१