नवी मुंबई, 20 जानेवारी 2017 /AV News Bureau:
नेरुळ सेक्टर 19 येथे होणारा “वॉक विथ कमिशनर” 21 जानेवारी ऐवजी 28 जानेवारी रोजी होणार आहे.
संत शिरोमणी गुरुनानक साहीब उद्यान, डी-मार्ट समोर, सेक्टर 19, नेरुळ येथे 21 जानेवारी रोजी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे त्या दिवशी न होता पुढील शनिवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा. नियोजित जागीच होणार आहे. असून यावेळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे महापालिका विभागप्रमुखांसह उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी आपल्या सूचना / संकल्पना / तक्रारी याप्रसंगी सकाळी 6.00 वा. विभाग कार्यालयाच्या प्रतिनिधीकडून टोकन नंबर घेऊन महापालिका आयुक्तांकडे मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.