आयपीसी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
स्वप्ना हरळकर/AV News
नवी मुंबई, 19 जानेवारी 2017:
गेल्या काही महिन्यांपासून पाम बीच मार्गावर रात्रीच्या सुमारास बाईक रेसिंगचं प्रमाण वाढलं आहे. वेगाची नशा असलेल्या बाइकर्स आणि वाहनचालकांची ही झिंग उतरवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी पामबीच मार्गावर रात्रीचे पेट्रोलिंग वाढवून, शर्यत लावणारे बाईकर्स आणि वाहनचालकांविरोधात आयपीसी (भारतीय दंड संहिता कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
रस्ते अपघातांना आळा बसावा यासाठी संपूर्ण शहरात मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र सार्वाधिक धोकादायक ठरू पाहणाऱ्या पामबीच मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास काही बाईकर्स आणि कार चालक वेगाने गाड्या हाकण्यासाठी पामबीच मार्गावर येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. यामुळे अशा रेसर्सचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर रेसर्सचे ग्रुप शोधले जाणार आहेत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमक्ष समज देण्यात येईल त्यानंतरही रेसिंग सुरू ठेवल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी दिली.
दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांच्याशी संख्येत काहीशी घट झाली आहे. मात्र तरीही मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या चिंताजनक आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. असे असले तरी नवी मुंबईत वर्षभरात 317 जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. 2015 मध्ये ही संख्या 321 इतकी होती. रस्ते अपघांची ही संख्या चिंताजनक असून याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बेदरकार वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याची माहिती पवार यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या रस्ते अपघातांची माहिती पुढीलप्रमाणे –