भाजपचे चिन्ह नको 

रिपाइंचे भाजप प्रदेश अध्यक्षांना पत्र

 मुंबई,18 जानेवारी 2017 /AV News Bureau:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)  हा  भाजप सोबत युती मध्ये असला तरी स्वतंत्र अस्तित्व  असणारा पक्ष आहे. त्यामुळे  आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचे चिन्ह नको, असे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने भाजप प्रदेश अध्यक्षांना लिहिले आहे.

रिपाइंला सुद्धा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेद्वारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले . त्यामुळे सावध झालेल्या  रिपाइं (ए ) ने असे  प्रकार  पुन्हा घडू नयेत, असे विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा चे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना दिले असल्याची माहिती रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, डी एम चव्हाण  आदी  मान्यवर उपस्थित होते.

आगामी निवडणुकांमध्ये रिपाइं उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर  उमेदवार उभे राहू  नयेत . बंडखोरांना भाजपने निवडणूक चिन्ह आणि ए बी फॉर्म देऊ नयेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.