शिक्षक मतदार निवडणुकीसाठी तक्रार निवारण कक्ष

नवी मुंबई, 16 जानेवारी/  AV News Bureau:

कोकण विभाग मतदार संघाच्या 3 फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्हयामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee), स्थायी समिती (Standing Committee) , तक्रार निरीक्षण कक्ष (Complaint Monitoring Cell) तसेच कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष चित्रीकरण पथके (Special Video Team) व भरारी पथके (Flying Squad) गठीत करण्यात आली आहेत.

या तक्रार निरीक्षण कक्षांचा (Complaint Monitoring Cell) तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • कोकण विभाग प्रभारी अधिकारी दिपक वानखेडे, नायब तहसिलदार (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई,

दूरध्वनी क्र.022-27571516, भ्रमणध्वनी क्र.9757108717

  • पालघर जिल्हा प्रभारी अधिकारी किरण महाजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर,

दूरध्वनी क्र.02525-250808, भ्रमणध्वनी क्र.9822434196,

  • ठाणे जिल्हा प्रभारी अधिकारी मनोज मुरकर, जनसंपर्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे,

दूरध्वनी क्र.022-25343636, भ्रमणध्वनी क्र.9860580255,

  • रायगड जिल्हा प्रभारी अधिकारी रविंद्र चव्हाण, नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड,

दूरध्वनी क्र.02141-222118/224131, भ्रमणध्वनी क्र.9850756631,

  • रत्नागिरी जिल्हा– प्रभारी अधिकारी अर्चना गोखले, नायब तहसिलदार (करमणूक कर), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी,

दूरध्वनी क्र.02352-226248, भ्रमणध्वनी क्र.9765398844,

  • सिंधुदूर्ग जिल्हा प्रभारी अधिकारी प्रविण खाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग,

दूरध्वनी क्र.02362-228854, भ्रमणध्वनी क्र.9423957999 असा आहे, असे शिवाजी कादबाने, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उपायुक्त (समान्य), कोकण विभाग यांनी कळविले आहे.