मुंबई,15 जानेवारी 2017/AV News Bureau:
इंडियन ऑइल कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 42 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 3 पैशांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 16 जानेवारीपासून लागू होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होणाऱ्या बदलांवर भारतीय तेल कंपन्यांचे सातत्याने लक्ष असते. जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे आपल्याला अंतर्गत बाजारात तेलाचे दर वाढविणे भाग असल्याचे इंडियन ऑइलने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.