पेट्रोलपंपावरील कार्डबंदीचा निर्णय तुर्तास मागे

नवी दिल्ली,9 जानेवारी :

पेट्रोल पंपांना डेबिट –क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारावर 1 टक्का अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय बॅंकांनी  घेतलेला निर्णय लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे नागरिकांना कार्डाचा वापर करून आता इंधन विकत घेता येणार आहे.

बॅंकांनी पंप चालकांकडून अतिरिक्त शुल्क घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे  संतप्त झालेल्या ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या निर्णयाचा विरोध करीत आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट- क्रेडीट कार्डाद्वारे व्यवहार करणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे आधीच नोटबंदीने त्रस्त झालेल्या नागरिकांना याचा फटका बसणार होता. मात्र रात्री सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर बॅंकांना शुल्क आकारण्याचा निर्णय़ मागे घेतला आहे. त्यामुळे 13 जानेवारीपर्यंत तरी हा तिढा सुटला आहे.