नवी मुंबई, 8 जानेवारी / AV News Bureau :
कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याबाबतची आचारसंहिता 4 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभागीय स्तरावरील 9 जानेवारी रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
कोकण विभागीय लोकशाही दिन 9 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवन येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र भारत निवडणूक आयोगाने प्रेस नोट क्र. ECI/PN2/2017, दि.4/1/2017 अन्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्याबाबतची आचारसंहिता 4 जानेवारी पासुन लागु झालेली आहे. त्यामुळे दि. 9 जानेवारी 2017 रोजीचा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे.असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.