नागपूर आणि गोंदियात 67.36 टक्के मतदान

दोन्ही जिल्ह्यांतील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकe

मुंबई, 8 जानेवारी 17/AV News Bureau :

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आज प्राथमिक अंदाजानुसार 67.36 टक्के मतदान झाले.

मतदान झालेल्या 11 नगरपरिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 9 आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदांचा समावेश होता.सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाचा कालावधी होता. त्यासाठी 502 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होता. या सर्व ठिकाणी  9 जानेवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल.

नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –

नागपूर

कामटी-59.92,

उमरेड-74.87,

काटोल-70.75,

कळमेश्वर-75.59,

मोहपा-85.96,

रामटेक-70.20,

नरखेड- 71.04,

खापा-74.52

वसावनेर-73.56.

गोंदिया

गोंदिया-62.72

तिरोरा-73.15.