नवी मुंबई, 5 जानेवारी 17 /AV News Bureau :
सिडको अर्बन हाटमध्ये 28 डिसेंबर 2016 पासून सुरू झालेला हिवाळी महोत्सव 15 जानेवारी 2017 सुरू राहणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिक या हिवाळी महोत्सवाला भेट देवू शकणार आहेत.
या हिवाळी महोत्सवात विविध प्रकारच्या हॅन्डलुम व हस्तकलेच्या वस्तू, खड्याचे व चांदीचे दागिने, चित्रं, ड्रेस मटेरियल्स, सिल्क व कॉटन साड्या, कुर्ते, चामड्याच्या बॅग व चपला, काश्मिरी सिल्क मटेरियल व शालींचे विविध प्रकार या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. देशातील 10 विविध राज्यांमधील कारागिरांनी या हिवाळी महोत्सवात आपल्या वस्तू मांडल्या आहेत. त्यामुळे महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांना देशाच्या कानाकोपऱ्यातील पारंपरिक वस्तू एकाच छताखाली पाहण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
ठळक मुद्दे
- 2016 मध्ये सिडको अर्बन हाटमध्ये 290 दिवसांत 20 प्रदर्शनं, महोत्सव व विविध क्राफ्ट बाजार भरवण्यात आले.
- 2017 सालामध्ये देखील विविध 13 कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे.
- दर शनिवारी व रविवारी अर्बन हाट येथील ॲम्फीथिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.