उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

11 जानेवारी ते 8 मार्चदरम्यान निवडणूक प्रक्रिया चालणार

11 मार्चला सर्व राज्यांचे निकाल हाती येणार

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2017 :

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. 11 जानेवारी ते 8 मार्च या काळात निवडणूक प्रक्रिया पार पडून 11 मार्चला एकाच दिवशी सर्व राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

राज्यनिहाय जागा

मणिपूर – 60 जागा

पंजाब – 117 जागा

उत्तराखंड 70 जागा

उत्तर प्रदेश – 403 जागा

गोवा – 40 जागा

एकूण जागा – 690

राखीव जागा

अनुसूचित जाती -133

अनुसूचित जमाती – 23

मतदानाच्या तारखा

गोवा – 4 फेब्रुवारी

उत्तराखंड – 15 फेब्रुवारी

मणिपूर –  4 मार्च पहिला टप्पा व 8 मार्च दुसरा टप्पा

पंजाप – 4 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

11 फेब्रुवारी पहिला टप्पा

15 फेब्रुवारी दुसरा टप्पा

19 फेब्रुवारी तिसरा टप्पा

23 फेब्रुवारी चौथा टप्पा

27 फेब्रुवारी पाचवा टप्पा

4 मार्च सहावा टप्पा

8 मार्च सातवा टप्पा

 

  • पाच राज्यांमधील एकूण मतदार 16 कोटी
  • मतदान केंद्रांची संख्या 1 कोटी 85 लाख
  • दिव्यांगांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करणार
  • महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची व्यवस्था

निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा

उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंडसाठी २८ लाख रूपये तर मणिपूर आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी २० लाख रूपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.