नवी मुंबई, 3 जानेवारी/ AV News Bureau :
कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 16 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कोकण भवनमधील विभागीय आयुक्त कार्यालय आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, भिवंडी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील ज्या नागरिकांना कोंकण विभागातील शासनाच्या निरनिराळया कार्यालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्यावयाच्या असतील, त्यांनी अशा तक्रारी लेखी स्वरुपात सादर करायची आहे. तसेच लेखी तक्रारीसोबत आवश्यक त्या पुराव्यासह या समितीसमोर 16 जानेवारी रोजी बैठकीच्या वेळेपूर्वी कोकण विभागीय कार्यालयात दोन प्रतीत स्वतः येऊन द्याव्यात, असे कोकण विभागीय महसूल उप आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.