तीस हजार कि.मी.चे रस्ते बांधणार – मुख्यमंत्री

नवी मुंबई, 2 जानेवारी 2016 / AV News Bureau :

प्रत्येक  गावाला  जोडणारा  रस्ता हा  विकासाचा  महामार्ग  आहे. त्यामुळे पुढील  काही  वर्षांत ख्यमंत्री  ग्राम सडक  योजनेअंतर्गत प्रत्येक  गाव  रस्त्यानं जोडलं  जाणार  आहे.  राज्यभरात तीस  हजार  किलोमीटर  रस्ते बांधण्याची  सरकारची  योजना  असल्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस  यांनी सांगितलं

महाराष्ट्र  शासनाच्या ग्रामविकास  विभागातर्फे  खारघर  इथं  बांधण्यात  आलेल्या  ग्रामविकास  भवनाचे  उद्घाटन  आज  मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस  यांच्या  हस्ते  करण्यात  आलं. यावेळी गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आ.प्रशांत ठाकूर, आ. मंदा म्हात्रे, माजी खा.रामशेठ ठाकूर, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

  • संकेतस्थळ आणि अॅप

या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते महालक्ष्मी  सरसच्या संकेतस्थळाचे तसेच मोबाइल  अॅपचेही  उदघाटन करण्यात आले.

  • गावे डिजिटल करणार

राज्यातील सर्व गावं डिसेंबर 2018 पर्यंत डिजीटल  करण्याचा  प्रयत्न  होणार  आहे. फायबर  ऑप्टिकनं  सर्व  ग्रामपंचायती  जोडल्या  जाणार  आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळं वर्षभरात जवळपास पंधरा  हजार  मुलं  खाजगी शाळा  सोडून  जिल्हा  परिषदेच्या  शाळांमध्ये  दाखल  झाली  आहेत.  ग्रामीण भागातल्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू असलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळंच गेल्या वर्षभरात  हा  बदल  घडून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या सांगतिलं.

  • स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देणार

पंचायत  राज संस्थांचे  बळकटीकरण  व्हावं यासाठी  पंचायत  राज  संसंथांमध्ये  कार्यरत  असणा-या  अधिका-यांना जागा  उपलब्ध  व्हावी, तसंच  राज्यातील  स्वयं  सहाय्यता  गटांच्या  वस्तूंच्या  प्रदर्शनासाठी  जागा  उपलब्ध  व्हावी  या  हेतूनं  या  भवनाची  निर्मिती  करण्यात आली  आहे. त्यासाठी  33  गाळे राखीव  ठेवण्यात  आले  आहेत.