मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणार – सचिन अहिर
मुंबई, 29 डिसेंबर 2016/AV News Bureau
फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसनं ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. मुंबई महापालिकेची निवडणुक राष्ट्रवादी पुर्ण ताकतीनं लढणार असल्याचं यावेळी सचिन अहिर यांनी यावेळी सांगितलं.
पक्षाचे मुंबई व जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या वतीनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तसेच संघटन व त्यांच्या कामाचं मुल्यमापन करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. पुणे इथं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार, मुंबई प्रभारी आ.जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी पत्रकारांना दिली.
उमेदवारी देताना तरुण, सुशिक्षित तसेच सर्वसमाजातील घटकांना प्रतिनिधीत्व दिले जाईल. तसंच उर्वरित उमेदवारांच्या नावाची यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही अहिर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45 उमेदवारांची पहिली यादी पुढीलप्रमाणे –